महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हवामान बदल विषयक परिषद आजपासून

06:13 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक उत्तरदायित्व निश्चित करण्यावर भारताचा भर : बाकू येथे परिषदेचे आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ बाकू

Advertisement

हवामान बदल विषयक परिषद सोमवारपासून सुरू होणार असून भारत आर्थिक उत्तरदायित्व आणि दुर्बल समुदायांना संरक्षणाच्या मुद्द्यावर भर देणार आहे. अझरबैजानच्या बाकू येथे आयोजित होणाऱ्या या परिषदेत जगभरातील नेते आणि पर्यावरणतज्ञ सामील होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव या परिषदेत सहभागी होणार नाहीत. भारताच्या 19 सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह करणार आहेत.

परिषदेला भारताचा प्रतिनिधी 18-19 नोव्हेंबर रोजी संबोधित करणार आहे. परिषदेत भारताच्या प्रमुख प्राथमिकता हवामान बदल विषयक विकसित देशांचे आर्थिक उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, दुर्बल समुदायांसाठी मदत सुनिश्चित करणे आणि एक समान ऊर्जा परिवर्तनाला प्राप्त करणे असेल.

कॉप29 ला आश्वासनांच्या पुढे जात विकसित देशांना नेट झिरोचे लक्ष्य प्राप्त करण्यास वेग आणणे आणि स्वत:च्या वित्तीय प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सांगितले जाण्याची गरज आहे. आर्थिक उत्तरदायित्व सुसंगत, सुविधाजनक, उत्प्रेरक आणि विश्वसनीय असावे आणि सर्वात कमकुवत लोकांच्या रक्षणासाठी वास्तविक साधनसामग्री आणि क्षमता प्रदान करण्याची गरज असल्याचे ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेचे सीईओ डॉ. अरुणाभ घोष यांनी म्हटले आहे.

आर्थिक साहाय्याची सुविधा

यंदाच्या कॉप29 च्या बैठकीत आर्थिक उत्तरदायित्वासाठी नवे सामूहिक लक्ष्य निश्चित होण्याची अपेक्षा आहे. तसेच हा आकडा वार्षिक अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. हवामान बदलाला प्रभावीपणे हाताळण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे अनेक विकसनशील देशांचे मानणे आहे. ‘वित्त कॉप’च्या आवश्यकतेवर केनियाचे हवामान बदल दूत अली मोहम्मद यांनी भर दिला आहे. हा निधी हवामान बदलाला अनुकूल होण्यासाठी पूर्वीच झगडत असलेल्या देशांसाठी कर्जाचा भार न वाढविता वित्तपोषणाला प्राथमिकता देणारा असेल असे त्यांनी म्हटले आहे.

भारताची भूमिका

मागील परिषदांच्या विपरित भारत कॉप29 मध्ये कुठल्याही मंडपाचे यजमानपद स्वीकारणार नाही. भारत स्वत:च्या वाढत्या ऊर्जा गरजा आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासोबत एक विकसनशील देशाच्या स्वरुपात स्वत:च्या भूमिकेला संतुलित करत आहे. जग उत्सर्जन कमी करण्याप्रकरणी नेतृत्वासाठी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे पाहत असताना भारताने ही भूमिका घेतली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article