For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदापूर-बारामती मार्गावर धावणार ‘विना वाहक’ ई-शिवाई बस!

02:44 PM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदापूर बारामती मार्गावर धावणार ‘विना वाहक’ ई शिवाई बस
Advertisement

इंदापूर : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी इंदापूर आगारातून अत्याधुनिक ‘इलेक्ट्रिक ई-शिवाई’ बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही बस इंदापूर ते बारामती मार्गावर धावणार असून, प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी ही सेवा ‘विना वाहक’ अर्थात कंडक्टरशिवाय चालविण्यात येणार आहे.

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंदापूरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, RPIचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, RPIचे शहराध्यक्ष अमोल मिसाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे यांनी ई-शिवाई बसची वैशिष्ट्ये आणि सेवेबाबत माहिती दिली.

Advertisement

ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर-बारामती मार्गावर सुरू झालेल्या या आधुनिक बससेवेचे प्रवाशांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.