केएसआरटीसी बसमध्ये मांजराच्या पिल्लाला कंडक्टरने दिले हाफ तिकीट
12:10 PM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : कंडक्टरने मांजराच्या पिल्लाला हाफ तिकीट दिल्याची घटना केएसआरटीसी बसमध्ये घडली आहे. म्हैसूरहून मडिकेरीला जाणाऱ्या केएसआरटीसी बसमध्ये एक प्रवासी त्याच्यासोबत एक मांजराचे पिल्लू घेऊन जात होता. यावेळी कंडक्टरने मांजराच्या पिल्लाला हाफ तिकीट दिले. म्हैसूर-मडिकेरी केएसआरटीसी बसमधून जाताना कंडक्टरने मांजराच्या पिल्लूचे तिकीट विचारले. मांजराचे पिल्लू असो वा मुले त्यांचे तिकीट घ्यावे, असे म्हणत पिल्लाचे हाफ तिकीट काढले. सदर काढलेले तिकीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे.
Advertisement
Advertisement