आचरा येथे कंदिल बनविणे स्पर्धेचे आयोजन
आचरा प्रतिनिधी
दिवाळीचा आनंद तेजोमय व्हावा आणि हरवत चाललेली कंदिल बनवणे कलागुणांना वाव मिळण्याकरिता,सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा आचरा चिंदर, त्रिंबक, वायंगणीसाठी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यत कंदिल तयार करून तो आपण आपल्या दाराबाहेरील रस्ता किंवा पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंची वरच लावायचा आहे परीक्षक आपण दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच आपल्या घरी येऊन आपल्या कंदीलाचे संध्याकाळी परीक्षण करतील.
कंदीलाची लांबी, रंदी,उंची कमीत कमी दोन फूट असावी, तसेच त्यामध्ये विद्युत दिवा, (बल्ब) असणे आवश्यक आहे आपल्या कंदीलाचा युट्युब व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे आपले कौशल्य इतरांनाही कळेल स्पर्धेमध्ये कुटुंब,फ्रेड्स सर्कल बचत गट, वाडी मंडळ, महिला मंडळ म्हणजेच पंचक्रोशीतील कोणीही भाग घेऊ शकतात. यासाठी प्रथम क्रमांक रुपये ४००१/- द्वितीय क्रमांक रुपये ३००१/- तृतीय क्रमांक रुपये २००१/- असून उत्तेजनार्थ प्रथम व उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रू ५००/- असे पारितोषिक आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका फॉर्म मिळण्यासाठी सि-कॅफे आचरा, हॉटेल सिरॉक शेजारी येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.