For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वसुबारसचे मोठ्या श्रद्धेने आचरण

10:51 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
वसुबारसचे मोठ्या श्रद्धेने आचरण
Advertisement

बेळगाव : आपल्या बहुसंख्य सणांमध्ये निसर्ग आणि कृषी संस्कृती यांना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच सर्व सणांमध्ये विशेष महत्त्व असलेल्या दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसने होते. गुरुवारी शहर आणि परिसरात तसेच ग्रामीण भागात वसुबारस हा सण मोठ्या श्रद्धेने आचरण्यात आला. ‘ज्याच्या घरी गाय, तेथे विठ्ठलाचे पाय’ असे म्हटले जाते. अर्थात आपल्या संस्कृतीमध्ये गो-मातेला विशेष महत्त्व आहे. तिच्याबद्दल आणि वासराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या निमित्ताने ज्यांच्या घरी गायी, म्हशी आहेत अशा घरातील महिलांनी गोठा शेणाने सारवून स्वच्छ केला. गोठ्याच्या भिंतींवर तांदळाची पिठी अथवा चुन्याने विविध प्रतिक चिन्हे रेखाटली. गायींच्या गळ्यात झेंडूंच्या माळा घातल्या. सायंकाळी गोठ्यामध्ये पणत्या लावल्या, तसेच घराच्या प्रवेशद्वारापाशीही पणत्या लावून सणाची सुरुवात केली. सायंकाळी गायीला पुरणपोळी, दहीभात असा नैवेद्य  दिला. काही घरांमध्ये ज्वारी, बाजरी आणि गुळ एकत्र करून तो नैवेद्य गायीला देण्यात आला. शुक्रवारपासून सणाच्या उत्साही पर्वाला उधाण येणार आहे.

Advertisement

  • शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर धनत्रयोदशी, सायं. 6.11 ते रात्री 8.11
  • रविवार दि. 12 नोव्हेंबर नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान, पहाटे 4.45 ते 9.08
  • रविवार दि. 12 नोव्हेंबर लक्ष्मी-कुबेर पूजन, सायंकाळी 6.03 रात्री 8.04, रात्री 12.28 ते पहाटे 2.35, रात्री 2.23 ते पहाटे 4.45
  • सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी भगवान महावीर निर्वाण दिन
  • मंगळवार दि. 14 नोव्हेंबर वही पूजन आणि पाडवा, रात्री 12.24, पहाटे 2.31, सकाळी 6.51, सकाळी 9.05, दुपारी 1.01, दुपारी 2.40, सायंकाळी 5.59, रात्री 8
  • बुधवार 15 नोव्हेंबर भाऊबीज, सकाळी 6.51, सकाळी 9.05, दुपारी 1.01, दुपारी 2.39, सायंकाळी 5.59, रात्री 8
Advertisement
Tags :

.