For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्रकार रमेश हिरेमठ यांना पितृशोक

10:26 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
पत्रकार रमेश हिरेमठ यांना पितृशोक
Advertisement

बेळगाव : कागवाड तालुक्यातील मोळे गावचे प्रतिष्ठित नागरिक मडिवाळय्या बसलिंगय्या हिरेमठ (वय 79) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, एक विवाहित कन्या, भाऊ, बहीण, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मोळे (ता. कागवाड) या मूळगावी मडिवाळय्या यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश हिरेमठ यांचे ते वडील होत.

Advertisement

Advertisement
Tags :

.