सुरंगपाणी येथील दादा पंडित महाराज यांना मातृशोक
05:12 PM Mar 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वायंगणी-पंडितवाडी येथील रहिवासी व वायंगणी सुरंगपाणी येथील श्रीदेव विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांच्या मातोश्री श्रीम. प्रेमलता सावळाराम पंडित (९२) यांचे सोमवार दि. ३ मार्च रोजी वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे, सुना, ३ मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement