For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ॲड. श्यामराव सावंत यांना पितृशोक

12:07 PM Jul 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
ॲड  श्यामराव सावंत यांना पितृशोक
Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

Advertisement

माजगाव येथील एन. आर. सावंत (८९) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आज दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ॲड. शामराव सावंत यांचे ते वडील होत. माजगाव सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य असताना त्यांनी शेकडो निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. काँग्रेसचे निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ते होते. सामाजिक कार्य हे त्यांनी निस्वार्थी भावनेने केले. आताच्या राजकारणापासून ते अलिप्त होते.काँग्रेसचे तत्कालीन सावंतवाडी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.सावंतवाडी संस्था मराठा समाजाच्या वसतिगृह स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीमध्ये ते बारा वर्षे संचालक होते.१९७० मध्ये आरपीडी हायस्कूलच्या संस्थेवर त्यांनी संचालक म्हणून दहा वर्ष काम केले तसेच ते स्कूल कमिटी सदस्य होते. आज अल्पशा आजारानं त्यांच निधन झालं.,माजगावचे माजी उपसरपंच ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक गोपाळ सावंत, अँड. शामराव सावंत, पुणे येथील अँड प्रसाद सावंत, सावंतवाडी येथील आर. पी . डी कॉलेजच्या प्रा. सौ रमा सावंत - घोरपडे यांचे ते सासरे, तर लांजा कॉलेजचे ग्रंथपाल कमलाकर सावंत यांचे ते काका होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.