आमदार निलेश राणे यांच्याकडून शोक व्यक्त
11:09 AM Jun 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरण
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
अहमदाबाद येथे घडलेला भीषण विमान अपघात मन सुन्न करणारा आहे, या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांनी आपला जीव गमावला. या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.अशी फेसबुक पोस्ट करीत कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे . ही घटना केवळ एक अपघात नसून, अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दुःख घेऊन आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून , ती अत्यंत वेदनादायक आहे.या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, त्यांना मानसिक आणि शारीरिक बळ मिळावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो., असे आमदार निलेश राणे म्हणाले आहेत.
Advertisement
Advertisement