For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दिल्लीत फटाक्यांना सशर्त अनुमती

06:22 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत फटाक्यांना सशर्त अनुमती
Advertisement

दिवाळीनिमित्त ठराविक वेळेची मर्यादा निश्चित : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर या दोन दिवशी हरित फटाके वाजविण्यास अनुमती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महत्त्वाच्या अटी घालून ही अनुमती दिली. या दोन दिवशी सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 या वेळांमध्ये नागरिक फटाके वाजवू शकणार आहेत. मात्र, 9 नोव्हेंबरपासून पुन्हा फटाक्यांवरील बंदी लागू होणार आहे. दिवाळीचा आनंद लोकांना साजरा करता यावा, यासाठी ही मुभा देण्यात आल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट केले गेले.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना काही महत्त्वाच्या अटीही लागू केल्या आहेत. रुग्णालये, वृद्धाश्रम, सरकारकडून घोषित करण्यात आलेले शांतता विभाग, शुश्रूषा गृहे, तसेच प्राथमिक आणि जिल्हा केंद्रे यांच्यापासून 300 मीटर त्रिज्येच्या आत कोणत्याही प्रकारे फटाके वाजविण्यात येऊ नयेत, ही प्रमुख अट घालण्यात आली आहे. केवळ प्रशासनाने मान्यता दिलेले हरित फटाके वाजविण्यासच ही अनुमती देण्यात आली असून अन्य कोणत्याही फटाक्यांवरील बंदी लागूच आहे.

प्रशासनाला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनालाही आपला हा आदेश काटेकोरपणे लागू करण्याची सूचना केली आहे. ज्या फटाक्यांमध्ये बेरियमचा उपयोग करण्यात आलेला आहे किंवा जे फटाके सीएसआयआर किंवा एनईईआयआर या संस्थांनी संमत केलेले नाहीत, असे हरित फटाके वाजविण्यावरही बंदी राहणार आहे. प्रशासनाने जे हरित फटाके संमत करण्यात आले आहेत, तेच वाजविले जातील, हे सुनिश्चित करावे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असाही आदेश दिला गेला आहे. दिल्लीतील वातावरणात सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढण्यास प्रारंभ झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वातावरण अधिक प्रमाणात प्रदूषित असते. त्या

Advertisement
Tags :

.