महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पैगंबरबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा मुस्लीम समाजाकडून निषेध

10:53 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूरमध्ये आंदोलन : पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निवेदन

Advertisement

खानापूर : मुस्लीम समाज हा शांतताप्रिय समुदाय आहे. आपण सर्व भारतात बंधुभावाने रहात आहोत. काही स्वामीजींनी राजकीय स्वार्थापोटी पैगंबराविरुद्ध निंदनीय विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजातील बंधूभाव दरी निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका मुस्लीम समाजाच्यावतीने मौलाना अफजल यांनी करत रामगीर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.प्रेषित मुहम्मद यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्रातील रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना देण्यात आले. या निषेध मोर्चात तालुक्यातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Advertisement

तालुक्यातील सर्व गावातून हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाजबांधव पारिश्वाड क्रॉस येथील टिपू सुलतान चौकात एकत्र जमा झाले. यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन रामगिरी महाराजांच्या निषेधाच्या घोषण देत तसेच मोहम्मद पैगंबर यांचा जय जयकार करत, मोर्चा काढला. मोर्चा शिवछत्रपती चौकात आल्यानंतर निदर्शने करण्यात आली. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेला. या ठिकाणी मुस्लीम समाजातील प्रमुखांची आणि मौलानांची रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करणारी भाषणे झाली. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

नासीर बागवान, रियाज पटेल, काशिमा हत्तीहोल्ली, अल्ताप बसरीकट्टी, बशीर मनियारा, अब्दुल हुडाली, मुजाफर टेकडी, सादीक नंदगडी, डॉ. फैयाज कित्तूर, लायकअल्ली बिच्चनावर, मौलाना अफजल, मौलाना इम्तियाज, मौलाना तौफीक, मौलाना नवीद, हाफिज मेहबूबा सुभानी, हाफिज मकसूद, हाफिज सलीम, मौलाना मौनोद्दिन, मौलाना रशिद, मौलाना कर्मोदीन, मौलाना अल्ताफ, बशीर मनियार, इरफान तालीकोटी, तोईद चांदकन्नावर, गुड्डूसाब टेकडी, इसाक खान पठाण यांच्यासह मुस्लीम समाजाचे नेते आणि कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खानापूर पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article