महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॉन्कॉर्डने बेंगळूरमध्ये केले 4.5 एकर जमिनीचे अधिग्रहण

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रकल्पातून 400 कोटी प्राप्तीची आशा

Advertisement

वृत्तसंस्था /बेंगळूर

Advertisement

रिअल इस्टेट कंपनी कॉन्कॉर्डने 400 कोटी रुपयांच्या एकूण कमाई क्षमतेसह निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांना बेंगळुरूमध्ये 4.5 एकर जमीन संपादित केली आहे. कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ही जमीन उत्तर बेंगळुरूमधील थानिसांद्रामध्ये आहे. या जमिनीवर सुमारे 400 कोटी रुपयांच्या महसूल क्षमतेसह निवासी प्रकल्प विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. सदरच्या नव्या प्रकल्पाचे काम जुलै 2024 मध्ये सुरु होणार असून प्रकल्पात 6 टॉवर्सची उभारणी केली जाईल. ज्यात दोन आणि तीन बीएचकेचे 424 फ्लॅटस् असतील. या प्रकल्पाकरीताचा एकूण खर्च हा 251 कोटी रुपयांचा असेल, असेही कंपनीने म्हटले आहे. कॉन्कॉर्डचे व्यवस्थापकीय संचालक अनिल आर. जी. म्हणाले की, हा प्रकल्प बेंगळुरूमध्ये साकारात कंपनीला आपला विस्तार आणखी वाढवायचा आहे. गेल्या 25 वर्षांत त्यांनी 2.5 लाख चौरस फूट निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केले आहेत. एकंदर तीन वर्षाच्या कालावधीत कंपनीला बांधकाम प्रकल्पांसाठी 1200 कोटी रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायची आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article