For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची सांगता

10:49 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची सांगता
Advertisement

धीरगंभीर-अंतर्मुख करणाऱ्या वेगवेगळ्या आशयांच्या एकांकिकांचे सादरीकरण 

Advertisement

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेतील वेगवेगळ्या आशयांच्या एकांकिकांचे सादरीकरण झाले. रविवारी दुसऱ्या दिवशी धीरगंभीर व अंतर्मुख करणाऱ्या एकांकिकांनी स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. यंदा कॅपिटल वनतर्फे आभासी तत्त्वावर निवड प्रक्रिया राबवून एकांकिका स्पर्धेसाठी संघांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत 4 आंतरशालेय व 13 आंतरराज्य संघांनी एकापेक्षा एक सुंदर एकांकिका सादर केल्या. निष्पाप कलानिकेतन इचलकरंजीच्या ‘चिनोबा’ या प्रयोगामध्ये हर्ष, प्रिया शिल्पा हे प्रियाच्या गावी फिरायला गेलेले असतात. बासरी वाजल्यामुळे गावकरी हर्षला श्रद्धास्थान चिनोबा समजतात. भोळ्या श्रद्धेवर विश्वास ठेवून लोक आनंदाने जगतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूरच्या ‘विषण’ या प्रयोगात शवागारात काम करणाऱ्या पाटीलचे मन प्रेते पाहून मेलेले असते. त्याचा स्वत:च्या मुलीवर जीव असतो,

पण संकटांनी ग्रासलेला पाटील विपरित विचार करतो, नंतर भानावर येतो, हा प्रसंग सादर करून वाहवा मिळविली. आंतरराज्य गटामध्ये अभिरुची कोल्हापूर आयोजित ‘इम्युनो कॉम्प्रमाईज’ या प्रयोगात जुनी पिढी व परदेशी जाणारी नवी पिढी यांचे काका हे पात्र नाटकात समरस झाले आहे. भूमिकेत इम्प्रुवाईझेशन झालेले दिग्दर्शकाला वाटत असताना शेवट वेगळाच घडतो, हे दाखवून दिले. नाट्याशुभांगी जयसिंगपूरच्या ‘फिनिक्स’ या एकांकिकेमध्ये एका गावात दुष्काळ पडल्याने दोघांना गाव सोडून जाण्याची वेळ येते. स्वत:चे पोट भरता येत नसल्याने जनावरे विकण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशा परिस्थितीत त्या दोघांना कुत्र्याची पिले सापडतात. कठीण परिस्थितीतही त्यांच्याकडून कुत्र्यांच्या संगोपनाची जिद्द पाहावयास मिळाली. यानंतर रंगयात्रा इचलकरंजी आयोजित ‘कूपन’, कलासक्त मुंबई आयोजित ‘संपर्क क्रमांक’, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर आयोजित ‘बीईंग नथिंग’, क्रिएटिव्ह कार्टी मुंबई आयोजित ‘इंटरोगेशन’ या एकांकिकांनी नाट्या रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.