For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्कॉन रथयात्रा महोत्सवाची सांगता

10:56 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्कॉन रथयात्रा महोत्सवाची सांगता
Advertisement

दोन दिवसांत लाखाहून अधिक भाविकांची हजेरी

Advertisement

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 26 व्या हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाची रविवारी सांगता झाली. मागील दोन दिवसात हजारो भाविकांनी रथयात्रेत सहभाग घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. शनिवारी रात्री शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रम पार पडले. कृष्ण जीवनावर आधारित नाटिका, प्रवचन, लहान मुलांचे नृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले. रविवारी दुपारी वैष्णव यज्ञ संपन्न झाला. यामध्ये अनेक परिवारांनी सहभाग घेतला होता. माधव चरणप्रभू, वृंदावन प्रभू यांनी या यज्ञांचे पौरोहित्य केले. रविवारी दिवसभरात इस्कॉनच्या ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली. संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी सुरू केलेली कृष्णभक्तीची चळवळ जगभरात कशी पोहोचली, भगवंतांचे जीवनातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. रविवारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement
Advertisement
Tags :

.