For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी, श्री दुर्गादेवी यात्रेची सांगता

10:04 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी  श्री दुर्गादेवी यात्रेची सांगता
Advertisement

नंदगड : अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी व श्री दुर्गादेवीचे सिमेकडे प्रस्थान झाल्यानंतर रविवारी यात्रेची सांगता झाली. आपल्या लाडक्या देवीला सीमेकडे पाठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. अळणावर येथील श्री लक्ष्मी देवी व श्री दुर्गादेवी यात्रोत्सव बारा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि. 18 पासून मोठ्या उत्साहाने सुरू झाला होता. दि. 18 रोजी विवाह सोहळा, दि. 19 रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम, दि. 20 पासून तीन दिवस शहरातील प्रमुख मार्गावरून देवीची मिरवणूक काढण्यात आली. अळणावर येथील लक्ष्मीदेवी व दुर्गादेवी यात्रेनिमित्त पाच खाणी रथ बांधण्यात आला. या रथामध्ये दोन्ही मूर्ती ठेवून प्रथेप्रमाणे शहरातील नियोजित मार्गावरून मंगळवार दि. 23 रोजी  रथ ओढण्यात आला. त्याच  दिवशी सायंकाळी देवींची गदगेवर स्थापना करण्यात आली.रविवार दि. 28 रोजी सायंकाळी देवींच्या मूर्तींना गदगेवरून खाली घेऊन मंडपाच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गदगा परिसरात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी उशीरा देवींचे सीमेकडे प्रस्थान झाले.

Advertisement

मंगळवारी पुन्हा देवींची मंदिरात होणार स्थापना

यात्रेनिमित्त श्री लक्ष्मीदेवी व श्री दुर्गादेवीची मूर्ती मंदिराबाहेर काढून विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, सिमेकडे प्रस्थान आदी कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता होते.  मंगळवार दि. 30 रोजी दोन्ही देवींच्या मूर्तींची मंदिरात स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मानकरी व सार्वजनिकांची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.