For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलई तांत्रिक विद्यापीठात इन्व्हेंटो-2024 ची सांगता

10:18 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलई तांत्रिक विद्यापीठात इन्व्हेंटो 2024 ची सांगता
Advertisement

बेळगाव : केएलई टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या शेषगिरी महाविद्यालयाच्या आवारामध्ये दि. 9 ते 11 मार्च दरम्यान इन्व्हेंटो 2024 या तंत्रज्ञान सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये 20 महाविद्यालयांतून 1524 विद्यार्थ्यांनी 34 उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. तर 500 संघांची नोंदणी करण्यात आली होती. इन्व्हेंटो-2024 या तांत्रज्ञानिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्रतिभा दाखविण्यासाठी ही उत्तम संधी दिली होती. दि. 10 रोजी अभिनेता, स्टॅन्डप कॉमेडियन, डिजिटल कंटेन्ट निर्माता पियुश शर्मा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैशिष्ट्यापूर्ण शैलीमध्ये कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दि. 11 रोजी गायक, संगीत निर्माता, मल्टिइन्स्टूमेंटलिस्ट आर्य साळवी यांच्या इंडीरॉक आणि पॉप संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. तेजस दोशी, प्रा. अश्विनी देसाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील, प्रा. गिरीधर हेब्बाळे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमित पाटील यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.