For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेची सांगता

10:21 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेची सांगता
Advertisement

भंडाऱ्याची उधळण-महालक्ष्मी देवीचा जयघोष करत हजारो भक्तांची अलोट गर्दी : यात्रा शांततेत

Advertisement

वार्ताहर /किणये

पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण करीत व महालक्ष्मी देवीचा जयघोष करत बुधवारी सायंकाळी बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावच्या महालक्ष्मी देवी यात्रेची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. नऊ दिवस बिजगर्णी गावात महालक्ष्मी देवीची यात्रा झाली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सायंकाळी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.

Advertisement

मातंगीला अग्नी

बुधवारी सकाळी 8.30 वा. महाआरती करण्यात आली. महाआरती यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, नामदेव मोरे, चांगदेव जाधव, सर्व सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत झाली. दुपारी चारच्या दरम्यान प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात देवीची खांद्यावरून मिरवणूक काढली. त्यानंतर मातंगीला अग्नी देण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात बिजगर्णा गावच्या पूर्वेला असलेल्या सीमेवर देवीचे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मानकऱ्यांचा विधी झाल्यानंतर सीमेवर या यात्रा उत्सवाची सांगता झाली.बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तीन गावची महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल तीस वर्षानंतर बिजगर्णी गावात भरविण्यात आली. दि. 16 रोजीपासून यात्रेला प्रारंभ झाला होता. दि. 17 रोजी देवीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला. यावेळी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गावात देवीची रथोत्सव मिरवणूक झाली. सायंकाळी बिजगर्णी गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात देवी गदगेवर विराजमान झाली.

नऊ दिवस यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

नऊ दिवस यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. मराठी शाळेच्या आवारात खेळणी, आईस्क्रीम आदी स्टॉल उभारण्यात आले होते. बिजगर्णी ग्रामपंचायतच्यावतीने यात्रेनिमित्त कावळेवाडी व बिजगर्णा या दोन्ही गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तीस वर्षानंतर झालेली ही यात्रा अगदी शांततेत पार पडली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायतचे अध्यक्ष व सर्व सदस्य बिजगर्णी, कावळेवाडी, ग्रामस्थ व तऊण या साऱ्यांनी विशेष सहकार्य करून यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडली.

Advertisement
Tags :

.