For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानवापीमध्ये मध्यरात्रीच शंखनाद

07:00 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानवापीमध्ये मध्यरात्रीच शंखनाद
Advertisement

न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 31 वर्षांनी झाली पूजा : मंदिराचे लावले स्टीकर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये बुधवारी मध्यरात्रीच पूजा करण्यात आल्याने तब्बल 31 वर्षांनी या परिसरामध्ये पुजेचा शंखनाद घुमला. वाराणसी जिल्हा प्रशासनाने 24 तासात त्या परिसरातील बॅरिकेड्स हटवण्याचे आणि पूजा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर उत्साही भक्तांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास व्यासजींचे तळघर उघडले. दोन वाजण्याच्या सुमारास ही पूजा करण्यात आली. तर गुरुवारी सकाळी परिसरामध्ये जमलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

Advertisement

तब्बल 31 वर्षानंतर बुधवारी रात्री उशीरा येथील व्यास तळघरामध्ये पूजा करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रात्रीच्या सुमारास दीपप्रज्वलन करून गणेश- लक्ष्मीची आरती करण्यात आली. तसेच तळघराच्या भिंतीवरील त्रिशुलासह इतर धार्मिक प्रतिकांचीही पूजा करण्यात आली. व्यासजींच्या तळघरामध्ये विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओमप्रकाश मिश्रा, आणि गणेशवर द्रविड यांनी पूजा केली. मंगलागौरीचीही विधीवत पूजा करण्यात आली. नोव्हेंबर 1993 मध्ये येथील पूजा थांबवण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. त्यानंतर वाराणसी कोर्टाने बुधवारी हिंदू पक्षाला व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली आहे.

ज्ञानवापी प्रकरणामध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने व्यास कुटुंबीयांना संकुलाच्या तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी दिली होती. हिंदू पक्षाचे वकिल विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, व्यासजींच्या तळघरामध्ये पूजा करण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे. काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरामध्ये त्यानुसार पूजा करण्यात आली आहे. व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत या तळघरामध्ये पूजा करत होते. 1993 मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशानंतर तळघरातील पूजा बंद करण्यात आली. त्यानंतर व्यास कुटुंबीय येथे पुन्हा पूजा करण्याबाबत परवानगी माग होते. बुधवारी रितसर परवानगी दिल्यानंतर तेथील बॅरिकेडस हटवण्यात आले आणि मध्यरात्री पुजेचे सुस्वर तेथे उमटले. दरम्यान, वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लिम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुस्लिम पक्षाने म्हटले आहे. मुस्लिम पक्षाने एएसआय सर्वेक्षण नाकारले होते. दरम्यान, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असलेल्या गौदोलिया चौकामध्ये स्थानिक प्रशासनाने लावलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिण्यात आलेल्या ज्ञानवापी मशिद ऐवजी ज्ञानवापी मंदिर असे स्टीकर लावले. फलकावर लिहिलेला मशीद असा उल्लेख मंदिर या स्टीकरने झाकून टाकल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हीडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Advertisement
Tags :

.