For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दुष्काळग्रस्त हातकणंगले,गडहिंग्लज तालुक्यात शासनाच्या सवलती अंमलात आणा

02:54 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
दुष्काळग्रस्त हातकणंगले गडहिंग्लज तालुक्यात शासनाच्या सवलती अंमलात आणा
Collecter Rahul Rekhawar

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये जिह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करुन त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Advertisement

जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सुट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी.योजना अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यातील गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.