भाज्यांपासून निर्मित वाद्यांनी कॉन्सर्ट
शोनंतर प्रेक्षकांना देतात वाद्यांनी निर्मित सूप
भाज्यांचे काम भोजनात स्वाद आणि पोषण वाढविणे असते. परंतु एक असा ऑर्केस्ट्रा बँड आहे, जो भाज्यांना वाद्यांप्रमाणे वापरतो आणि त्याचा एक व्हेजिटेबल बँड देखील आहे. भाज्यांनी निर्मित या वाद्यांचा वापर करणाऱ्या या ऑर्केस्ट्राचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे.
ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथील व्हेजिटेबल ऑर्केस्ट्राच्या नावावर जगातील सर्वाधिक भाज्यांच्या वाद्यांद्वारे कॉन्सर्ट्स करण्याचा विक्रम आहे. एकूण 11 वाद्यं असलेल्या या ऑर्केस्ट्राला 1998 मध्ये सर्वप्रथम व्हिएन्ना येथे स्थापन करण्यात आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत एकूण 344 कॉन्सर्ट्स करण्यात आले आहेत. या ऑर्केस्ट्रात गाजराचा रिकॉर्डर, ककंबरफोन, रॅडिश बास फ्ल्यूट, वांगे आणि कांद्याचा वायोलिन सामील आहे. इतर वाद्यांतून काढता न येणारे ध्वनी आम्ही काढू शकतो असे आमचे मानणे आहे. अनेकदा हा एखाद्या प्राण्याचा आवाज वाटतो, तर काही वेळा वेगळाच आवाज असल्याचे वाटते असे ऑर्केस्ट्राच्या वेबसाइटवर म्हटले गेले आहे.
हा समूह केवळ निवडक वाद्यांचा वापर करत नाही, तर वेळोवेळी अनेक नवी उपकरणे देखील तयार करतो. याचबरोबर दरवेळी त्यांना स्वत:ची वाद्यं निर्माण करावी लागतात, कारण भाज्या काही काळानंतर खराब होत असतात.
भाज्या खराब होण्याच्या स्थितीत त्यांना बॅकअप वाद्यांसाठी देखील तयार रहावे लागते. कॉन्सर्ट्सनंतर टीम प्रेक्षकांना त्याच भाज्यांद्वारे निर्मित सूप देखील देते. ऑर्केस्ट्राचे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रात संगीतकार आहेत. संगीत कशातूनही निर्माण करता येऊ शकते हे दाखवून देणे हा या टीमचा उद्देश असतो. प्रत्येक गोष्टीत आवाजा गुण असतो आणि ब्रह्मांडात त्याचा खासप्रकारचा ध्वनी देखील असतो. याचमुळे त्याचा वापर एखाद्या वाद्याप्रमाणे केला जाऊ शकतो असे टीमचे सांगणे आहे. ही टीम जगभरात टूर करते, त्यांचे संगीत ऐकून लोक चकित होत असतात.