For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या कोविड व्हेरिएंटची चिंता

06:55 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
नव्या कोविड व्हेरिएंटची चिंता
Advertisement

नव्या व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच जेएन.1 या व्हेरिएंटचा जगभरात प्रसार होत असताना आधी केरळ मग गोवा आणि सिंधुदुर्गात ऊग्ण आढळल्याने राज्यात किंचित चिंता वाढली. कारण हे तिन्ही प्रदेश परस्परांना लागून आहेत. मात्र या व्हेरिएंटची सौम्य लक्षणे ही जमेची बाजू असून त्यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढण्याची शक्यता सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अधिकारवाणीने व्यक्त करत आहेत. अर्थात यात कोविड लसीकरणाचेही महत्त्व यासोबत आहेच. त्यामुळेच हा विषाणू संशोधकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नव्या वर्षात व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट ठरणार आहे.

Advertisement

जगभरात जेएन.1 या व्हेरिएंट ऊग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्याने येणारे वर्षदेखील कोविड व्हेरिएंटच्या दहशतीखाली राहील की काय अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र ही भीती निराधार आहे. सामान्य माणसांनी कोविडला झुगाऊन आता एक दीड वर्षाचा कालावधी लोटला असला तरी नवनवे व्हेरिएंट दाखल होत असल्याने कोविडचे भूत अधूनमधून डोके वर काढत असते. गेल्या काही दिवसात जेएन.1 व्हेरिएंटचे ऊग्ण चीन, अमेरिका, सिंगापूर आणि भारत या देशात आढळले. रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील जेएन.1 पॉझिटीव्ह ऊग्ण अमेरिका वारी कऊन आल्याचे त्याच्या प्रवास इतिहासात नोंद केली आहे. तरी अद्याप आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गाईडलाईन केंद्रांकडून देण्यात आली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

देशातील पहिला जेएन.1 व्हेरिएंट विषाणूचा ऊग्ण केरळ राज्यात आढळल्याने पेंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे राज्य सरकारच आरोग्य विभाग तसेच महानगरपालिका सज्ज होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहेत. तोपर्यंत विषाणूचा प्रभाव 6 राज्यात दिसू लागला. जागतिक आरोग्य संघटनेने

Advertisement

ओमिक्रॉनच्या जेएन.1 या नव्या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ गटात धरले असून तो धोकादायक नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी कोविड लस घेतलेल्या तसेच कोविड वर्तणूक पाळणाऱ्यांना याचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. देशासह राज्यात पसरत चाललेल्या जेएन.1 या नव्या व्हेरियंटचा प्रसार वेग अधिक आहे. रविवारी राज्यात 9 जेएन.1 ऊग्णांची नोंद झाल्याने आता राज्यात जेएन.1 व्हेरियंट ऊग्णांची संख्या 10 झाली आहे. ठाणे, पुणे आणि अकोला याठिकाणी या ऊग्णांची नोंद झाली आहे. यात पुण्यातील एका ऊग्णाचा प्रवास इतिहासातून हा रूग्ण अमेरिकेतून आला असल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग जिह्यात हा रूग्ण आढळला होता. ऊग्णांची लक्षण सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान रविवारी ठाणे मनपा क्षेत्रात 5 रूग्ण तर पुणे मनपा क्षेत्रात 2 तर पुणे ग्रामीण क्षेत्रात 1 आणि अकोला मनपा क्षेत्रात 1 अशा नऊ ऊग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी 8 पुऊष तर 1 महिला आहेत. तसेच या नऊ जणांत 6 जण 40 वर्षावरील नागरिक असून 9 पैकी 8 जणांनी कोविड लस घेतली आहे. दिलासादायी बाब म्हणजे हे सगळे रूग्ण बरे झाले आहेत.

कोविड विषाणूचे उपप्रकार येत राहणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून दरवर्षी नवे व्हेरिएंट येत राहणार. नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराने घाबऊन जाण्याचे कारण नाही किंवा त्याचा प्रभाव सौम्य दिसला म्हणून बेफिकीर होऊनही चालणारे नाही. हा कोविड काळ असून नवनवे व्हेरिएंट येत राहणार तसेच ते व्हेरिएंट त्याचा प्रभावही दाखवणारच.

दरम्यान यावर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रंजन गर्गे यांनी व्हेरिएंटची सकारात्मक बाजू मांडत हा संसर्ग सौम्य लक्षणांचा असून सौम्य लक्षणांचा संसर्ग रोग प्रतिकारक शक्ती नेहमी वाढवत असल्याचे अधिकारवाणीने सांगितले. अशा प्रकारचा संसर्ग लोकांना आजारी पाडण्याच्या तुलनेत मानवी शरीराला प्रतिकार शक्ती देत असतो. अशा प्रकारचा संसर्ग झाल्यावर थोडासा आजार वाढतो. यातून अँटिबॉडीज वाढतात. जे नैसर्गिक असते. शरीरात अँटिबॉडीज वाढल्याने त्याचा संसर्ग थांबविण्याचे काम करते. संसर्गात ओमिक्रॉन अद्यापही आहे. त्याच

ओमिक्रॉनचा हा जेएन.1 व्हेरिएंट उपप्रकार आहे. मात्र या ओमिक्रॉनने फार घात केला असे कुठेच आढळत नाही. व्हेरिएंट बदलत राहणार आहे.

विषाणू स्वत: जीवंत ठेवण्यासाठी सतत नवनव्या व्हेरिएंटमध्ये येत आहे. मात्र हे व्हेरिएंट मनुष्याला किती घातकी आहे हे पाहणे तपासणे, प्रामुख्याने महत्त्वाचे ठरेल. ज्यावेळी व्हेरिएंट नव्या प्रकारात येतो. त्यावेळी शरीरात त्वरीत अँटिबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे अशा व्हेरिएंटचा प्रभाव दिसून येत नाही. मात्र सहव्याधी ऊग्णांवर नव्या व्हेरिएंटचा परिणाम सतत दिसून येतोच. यात ज्येष्ठ नागरिक, मधूमेही किंवा उच्च रक्तदाब आदी व्याधी असणाऱ्या ऊग्णांवर नव्या व्हेरिएंटचा प्रभाव दिसून येत आहे. या व्हेरिएंटच्या इतिवृत्तानुसार रविवारपर्यंत देशातील सहा राज्यांत जेएन.1 विषाणूने बाधित 64 ऊग्णांची नोंद करण्यात आली असून गोव्यात 34, महाराष्ट्रात 10, कर्नाटकात 8, केरळात 6, तामिळनाडूमध्ये 4 आणि 2 ऊग्ण तेलंगणात सापडले आहेत. यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय कोरोना पॉझिटीव्ह संख्यादेखील वाढताना दिसून येते आहे. त्यात व्हेरिएंट असलेल्या जेएन.1 चा वेग ही दिसून येत आहे. केरळमध्ये सुऊवात झाली असली तरी गेल्या चार दिवसात राज्यातील या विषाणूची ऊग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे.

लसीकरणाचा फायदा होणार

ऊग्णांनी लसीकरण मोहिमेतून यापूर्वी घेतलेल्या लसींचा थोड्याफार प्रमाणात फायदा होणार आहे. दरम्यान या लसींचा प्रभाव आयुष्यभरासाठी राहील असे कुठेही सांगितले नव्हते. मात्र घेतलेला डोस नव्या येणाऱ्या प्रत्येक व्हेरिएंटच्या प्रतिबंधासाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बुस्टर डोस लसीकरण अद्याप सुऊच आहे. मात्र बहुतांश जणांचे बुस्टर डोस लसीकरण झाले नाही. मात्र ज्यांचे बुस्टर लसीकरण झाले आहे अशांना लसीचा फायदा होईल असे डॉक्टर सांगतात. विषाणू जिवंत राहण्यासाठी नवनवे व्हेरिएंटमधून जगासमोर येत राहणार. म्हणजे व्हेरिएंट ही सततची प्रक्रिया आहे. मात्र त्याच्या बदलल्या स्वऊपाने संसर्गित बाधित ऊग्णांना किती प्रमाणात त्रास होत आहे हा वादाचा मुद्दा आहे. सध्याच्या जेएन.1 व्हेरिएंटमुळे ऊग्णांना अति गंभीर असा कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळेच आपण त्याला सौम्य लक्षणांचा व्हेरिएंट म्हणत आहोत.

गेल्या दोन वर्षात असे व्हेरिएंट आले. त्या व्हेरिएंटने बाधित झालेले ऊग्ण सात दिवसात बरेही झाले. तसेच याही व्हेरिएंटने बाधित झालेले ऊग्ण सात आठ दिवसात बरे होत आहेत. मात्र काळजी घेणे आवश्यक असून बुस्टर डोस तसेच कोविड वर्तणूक नियम पाळणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सजगता वाढवली असून ऊग्णालये सज्ज ठेवण्यात आली.

राम खांदारे

Advertisement
Tags :

.