श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट प्रशालेस संगणक भेट
02:56 PM Jan 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाची अत्यंत आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन सन्माननीय दात्त्यांनी 50000 रुपयांचा संगणक प्रशालेस प्रदान केला. यामध्ये डॉ. उल्हास गावकर 25000 रुपये सौ. सुनीता अभिमन्यू कवठणकर व श्री निखिल अभिमन्यू कवठणकर 25000 रुपये असे एकूण 50000 रुपये दिले .यासाठी भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण) मुंबई कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे सह खजिनदार मा. अभिमन्यू कवठणकर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेला संगणक भेट दिल्याबद्दल भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण) मुंबई या संस्थेचे अध्यक्ष मा. विजय पाटकर. कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे ऑन. जनरल सेक्रेटरी मा. साबाजी करलकर व मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आभार मानले
Advertisement
Advertisement