For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सीपीआर’मध्ये गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

01:10 PM Jan 03, 2025 IST | Radhika Patil
‘सीपीआर’मध्ये गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

गरीब व गरजूंना आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) दंतशास्त्र विभागामध्ये जबड्याशी निगडित गुंतगुतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत आहेत. दंतशास्त्र विभागात अध्ययावत तंत्रज्ञ विकसित झाल्याने जबड्याच्या विविध शस्त्रकिया मोफत होत आहेत.

सीपीआरमध्ये फक्त दात काढण्याचे काम होते हा एक निव्वळ गैरसमज होता. तो आता खोडून निघत आहे. अद्ययावत उपकरणांचा वापर करुन तज्ञ डॉक्टरांकडून मौखिक आरोग्यासंबधी सर्व उपचार करण्यात येत आहेत. दंतशास्त्र विभागात जबडयाचे श्ल्म्दल्rस्ब्म्देग्s, अपधात/दुखापती मुळे तुटलेले जबड्याचे व चेहऱ्यांचे हाडांचे शस्त्रक्रिया, मौख्खिक कॅन्सर, अडकलेली अक्कल दाढ काढणे, निखळलेला जबड्याचा सांधा नीट करणे, यासारखे अनेक गुंतागुतीचे उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंतशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गायत्री कुलकर्णी, विभागातील अधिकारी डॉ. अमोल लाहोटी, डॉ. सुमित शेडगार, डॉ. किरण कुलकर्णी, डॉ. चिन्मयी कुलकर्णी, डॉ. कोमल कुंडलकर, राकेश पाटील, ओंकार शिखरे यांची टीम सर्व सामान्यांना उपचारासाठी कार्यरत आहेत.

दंतविभागामध्ये दात, जबडा, हिरडी यासंबंधी तक्रारीवर Rददू ण्aहत् उपचार, हिरडी रोगावरील शस्त्रक्रिया, दात बसवण्यासाठी अंशिक किंवा संपूर्ण कवळी आदी उपचार दंतशास्त्र विभागातर्फे अजून उत्तमरीत्या सर्वापर्यत पोचवण्याच्या मानस आहे. लवकरच विभागामध्ये दात बसविणे, रुट कॅनॉल, सिमेंट भरणे इत्यादी सुविधा रुग्णास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख डॉ. गायत्री कुलकर्णी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.