कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एसआयआर’मध्ये जटीलता अनावश्यक

06:21 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदी यांची सूचना, भाजप नेत्यांना संदेश

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ (एसआयआर) ही आवश्यक प्रक्रिया आहे. मात्र, ती पारदर्शक आणि सोपी असण्याची आवश्यकता आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही सूचना त्यांनी पुढच्या वर्षीच्या एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना अनुलक्षून केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘एसआयआर’ प्रक्रियेत सहकार्य करून ती योग्य रितीने पार पडेल, याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित राज्यांमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक खासदाराने सतर्क आणि कार्यरत असावे, असा आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी दिला आहे.

पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी पश्चिम बंगाल आणि आसाम येथील निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी विशेषत्वाने महत्वाच्या आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी पूर्ण सज्जतेनिशी संग्राम करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यामुळे या राज्यातील ‘एसआरआर’ प्रक्रियेवर भारतीय जनता पक्षाचे विशेष लक्ष आहे. पक्षाच्या प्रत्येक खासदाराने आणि आमदाराने आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून रहावे आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेशी संबंधित कामांना आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात तळागाळातील मतदारांशी संपर्कात रहावे. केंद्र सरकारची कामे आणि कल्याणकारी योजना यांची माहिती सर्वसामान्य मतदारांना द्यावी, अशा अनेक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. ते स्वत: प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.

शिष्टमंडळाशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीसंबंधी चर्चा केली. नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे. अनुकूल परिस्थितीला जास्तीत जास्त लाभ उठविण्याचा प्रयत्न करावा. पक्षाची सामर्थ्यस्थळे अधिक बळकट करावीत. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या राज्यात विधानसभेच्या केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2016 च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या 77 पर्यंत पोहचली. हाच कल आगामी विधानसभा निवडणुकीत राखल्यास यश निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नेत्यांकडून घेतली माहिती

पश्चिम बंगालमध्ये आणखी साधारणत: साडेपाच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पक्षाची स्थिती राज्यात कशी आहे, यशाची शक्यता किती आहे, कोणत्या भागांमध्ये पक्ष बळकट आहे, तसेच कोणत्या भागांमध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशा अनेक प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांनी नेत्यांकडून स्थितीची माहिती घेतली. सातत्याने तळागाळातील मतदारांशी स्वत:ला जोडलेले ठेवा, असा संदेश त्यांनी दिला आहे.

संघटनात्मक सज्जतेवर भर

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत यश मिळविण्याचा प्रयत्न प्राणपणाने करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासाठी राज्यातील पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला कामे वाटून देण्यात आली असून ती निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. प्रत्येक मतदानकेंद्राचा विचार करुन त्याप्रमाणे योजना सज्ज केल्या जात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास दुणावला असून आता पश्चिम बंगालमध्येही पराक्रम करुन दाखविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत. आगामी पाच महिन्यांमध्ये पक्ष पूर्ण सज्ज करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article