केशवराव भोसले नाट्यगृहाची पहिल्या टप्प्यातील कामे तत्काळ पुर्ण करा
कोल्हापूर :
संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणीच्या कामाचा गुरुवारी प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील सुरु असलेल्या कामाचा सविस्तर आढावा प्रशासक कार्तिकेयन यांनी घेतला. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रस्तावित असणाऱ्या कामांचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. तसेच पहिल्या टप्यातील कामे लवकरात लवकर पुर्ण करा अशा सुचनाही प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी दिल्या.
गुरुवारी दुपारी प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी केशवराव नाट्यागृहाची पाहणी केली. नाटयगृहामध्ये ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेतला. पहिल्या टप्यामध्ये मंजूर कामातील इमारतीच्या मजबूती करणासाठी सुरु करण्यात येणाऱ्या ग्राऊटींगची सविस्तर माहिती ठेकेदार व सल्लागार कंपनीकडून घेतली. यावेळी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी नाटयगृहाच्या पहिल्या टप्यातील मंजूर कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात नाट्यागृहामध्ये कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता मिलींद पाटील, केशवराव नाटयगृहाचे मॅनेजर समीर महाब्री, ठेकेदार लक्ष्मी हेरिकॉन प्रा.लि. चे सत्यजित मासेकर, सल्लागार कंपनी स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि.चे कन्स निरज आरुरकर, राजेश् यादव, राजेश घोरपडे, आर्किटेक्ट जॉईस स्टिटस, सलोनी खारकर उपस्थित होते.