For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंदनगर येथील ‘त्या’ नाल्याचे बांधकाम पूर्ण करा

10:40 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आनंदनगर येथील ‘त्या’ नाल्याचे बांधकाम पूर्ण करा
Advertisement

आनंदनगर-वडगाव रहिवासी असोसिएशनचे मनपा आयुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : आनंदनगर येथील तो नाला 14 फुटाचा आहे. त्या नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहेत. मात्र त्यामुळे नाल्याचे पाणी अनेकांच्या घरे शिरत आहेत. दरवर्षी यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या या नाल्याची खोदाई करण्यात येत असून तो नाला अर्धवट ठेवण्यात आला आहे. तेंव्हा त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी आनंदनगर-वडगाव रहिवासी असोसिएशनने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आनंदनगर येथील या नाल्याच्या जागेवरच घरे बांधण्यात आली. आता सर्व्हे करताना संबंधित घरमालक त्याला विरोध करत आहे. नाल्याची दिशा बदलावी, अशी मागणी करत आहे. मात्र ते शक्य नाही. सीडी नकाशाप्रमाणे सर्व्हे करून त्या नाल्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जर नाल्याचे काम पूर्ण झाले नाही तर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या नाल्याचे काम अर्धवट आहे. त्या नाल्यामध्ये लहान मुले किंवा जनावरे पडण्याची शक्यता आहे. तेंव्हा तातडीने नाल्याचे काम पूर्ण करावे. जर कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रभाकर शेट्टी, शंकर नंदी, मल्लाप्पा कुंडेकर, बाळू गोरल, सतीश खमकारट्टी, बाळासाहेब पाटील, प्रभाकर पाटील, आनंद चिठ्ठी, प्रकाश पाटील,  सावित्री ढवळी, लक्ष्मी कणबरकर, शोभा शोलार, विमल गडकरी, मालू चतुर, गीता जिरगे, राजू निलजकर यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.