For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 दिवसांत अर्ज निकाली काढा!

06:47 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
15 दिवसांत अर्ज निकाली काढा
Advertisement

जनता दर्शन कार्यक्रमात सिद्धरामय्या यांची अधिकाऱ्यांना सूचना : तब्बल 3,812 अर्ज

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी बेंगळुरातील आपल्या शासकीय निवासस्थानी सलग 7 तास जनता दर्शन (जनस्पंदन) कार्यक्रम घेऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या अनेक समस्या, निवेदनांवर त्यांनी त्वरित निर्णय घेतले. जनता दर्शनमध्ये सुमारे 3,812 अर्ज दाखल झाले असून अर्ज निकाली काढण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना 15 दिवसांची मुदत दिली.

Advertisement

जनता दर्शन कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले. हा जनता दर्शन कार्यक्रम नव्हे; जनस्पंदन कार्यक्रम. 3,500 हून अधिक अर्ज स्वीकारले आहेत. अजुनही लोक अर्ज घेऊन येत आहेत. हे अर्ज पुढील 15 दिवसांत निकाली काढावेत. शक्य तितके अर्ज स्थानिक पातळीवरच निकाली काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नोकरी, पेन्शनसाठी अधिक जण तक्रारी घेऊन आले आहेत. नोकरीसंबंधी तक्रारी घेऊन आलेल्या दिव्यांगांचीही संख्या अधिक आहे. पुढील तीन महिन्यानंतर पुन्हा जनस्पंदन कार्यक्रम होईल, त्यावेळी इतके अर्ज येऊ नयेत, अशी ताकिदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

कामाला विलंब हे भ्रष्टाचाराचे आणखी एक रुप

जनता दर्शन कार्यक्रम दोन महिन्यापूर्वीच व्हायचा होता. सर्व जिल्हा पालकमंत्र्यांना पत्र पाठवून जिल्हा स्तरावर जनता दर्शन कार्यक्रम राबवून अहवाल देण्याची सूचना केली होती. मात्र, मोजक्याच जिल्ह्यांकडून अहवाल आला आहे. ही बाब योग्य नाही. लोक पैसे खर्च करून बेंगळूरपर्यंत येत असतील तर तुमचा काय उपयोग? कामाला विलंब म्हणजे भ्रष्टाचाराचे आणखी एक रुप, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

2,862 अर्ज आयपीजीआरएस सॉफ्टवेअरवर अपलोड

सोमवारच्या जनता दर्शन कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने लोक तक्रारी, निवेदने घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. दिवसभरात 3,812 अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 2,862 अर्ज आयपीजीआरएस सॉफ्टवेअरवर अपलोड करण्यात आले आहेत. उर्वरित 950 अर्ज थेट स्वीकारण्यात आले आहेत. हे अर्ज देखील आयपीजीआरएस सॉफ्टवेअरवर अपलोड केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.