महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेक्कन मेडिकल सेंटर कडून रुग्णांची परिपूर्ण आरोग्य सेवा

10:35 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार हुक्केरींकडून हायटेक ओटीचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : माजी मंत्री आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी दोड्डण्णावर कुटुंबीयांनी बेळगावच्या लोकांसाठी केलेल्या सेवेचे आणि डेक्कन मेडिकल सेंटरने सर्व स्तरातून येणाऱ्या रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या परिपूर्ण आरोग्य सेवेचे कौतुक केले. शुक्रवारी सकाळी येथील डेक्कन मेडिकल सेंटरमध्ये अडवान्स्ड हायटेक ऑपरेशन थिएटर आणि इतर वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी एक लहान ऑपरेशन थिएटर व अल्ट्रामॉडर्न एंडोस्कोपी केंद्राचेही उद्घाटन केले.

Advertisement

राजनीती, समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या दि. कोमलअण्णा दोड्डण्णावर व दोड्डण्णावर कुटुंबातील इतर दिग्गजांचे मला मनापासून स्मरण आहे आणि डॉ. रमेश आणि डॉ. सावित्री दोड्डण्णावर यांनी सर्व श्रेणीतील रुग्णांची नि:स्वार्थपणे सेवा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आता या दाम्पत्याने एक भव्य हॉस्पिटल सुरू करण्याची वेळ आली आहे,’ असेही हुक्केरी म्हणाले.

यावेळी डॉ. रमेश दोड्डण्णावर यांनी आमदार हुक्केरी यांच्या विनम्रतेचे कौतुक केले. तसेच बेळगाव परिसरातील लोकांमध्ये डेक्कन हॉस्पिटल लोकप्रिय करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या टीमने दिलेल्या सेवांचेही कौतुक केले. डेक्कन मेडिकल सेंटर यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असल्याचे सांगून डॉ. सावित्री दोड्डण्णावर यांनी ऊग्णालयातील सेवांची माहिती दिली. यावेळी पुष्पदंत दोड्डण्णावर, वृषभ दोड्डण्णावर, राज दोड्डण्णावर, श्लोका दोड्डण्णावर, सरफराज जकाती, युसूफ मुल्ला, डॉक्टर, परिचारिका आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article