‘ई’केवायसी 28 फेब्रुवारी अखेर पूर्ण करा
कोल्हापूर :
अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी धान्य घेते वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांसह नजिकच्या रास्तभाव दुकानातून 28 फेब्रुवारी 2025 अखेर आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणिकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिधापत्रिका सोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणिकरण (ई- केवायसी) होणे आवश्यक आहे. त्याआधारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे.
सर्व रास्तभाव दुकानामध्ये आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणिकरण करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. तसेच कोणत्याही रास्तभाव धान्य दुकानातुन आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) करता येणार आहे. आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) न केल्यास भविष्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचेही श्रीमती चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ई केवायसी नसलेले 9 लाख लाभार्थी
जिह्यामध्ये प्रतिमहिना सरासरी 98 टक्के धान्य उचल होत असून सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आले आहेत. अद्यापही 9 लाख 16 हजार 701 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. शासन स्तरावरुन आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आदेश प्राप्त झाले असून सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी म्हटले आहे.
जिह्यात रास्तभाव धान्य दुकाने -1 हजार 685
अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक- 51 हजार 811
प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक -5 लाख 35 हजार 425
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच लाभार्थी संख्या-25 लाख 13 हजार 882