For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदारसंघाचा संपूर्ण विकास करणार

10:22 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदारसंघाचा संपूर्ण विकास करणार
Advertisement

महिला-बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : गोकाक मतदारसंघात प्रचार 

Advertisement

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जवळपास 4 हजार कोटींची विकासकामे हाती घेतली आहेत. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी केल्यास बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह संपूर्ण बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास केला जाईल, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गोकाक विधानसभा मतदारसंघात प्रचार करून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे. या योजना अधिक पारदर्शकपणे राबवून सर्वांना लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद दिला पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच

गॅरंटी योजना सत्तेत आल्यानंतर केवळ 100 दिवसांत जारी केल्या आहेत. कोणत्याच एजंटांचा त्रास नसताना थेट लाभार्थ्यांना योजनांचा लाभ करून देण्यात आला आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे. ही निवडणूक स्वाभिमानाचा प्रश्न आहे. कारण भाजप उमेदवार बाहेरून आले आहेत. बेळगावमध्ये उमेदवारांची कमतरता आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला. गेल्या 25 वर्षांत भाजप खासदारांकडून न केलेली विकासकामे आपला मुलगा केवळ पाच वर्षांमध्ये करून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्याकडूनही जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार असल्याचे काँग्रेस पक्षाला मतदान करून बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खनगाव जि. पं. माजी सदस्य निंगाप्पा बुळ्ळी, डॉ. महांतेश कडाडी, अशोक पुजारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

स्वामीजींचा आशीर्वाद

गोकाक तालुक्यातील अंकलगी येथील अडवीसिद्धेश्वर संस्थान मठाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी भेट देऊन मठाचे स्वामीजी अमरसिद्धेश्वर यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी निहाल हुलीकट्टी, आनंद नभापुरी, महांतेश पट्टणशेट्टी, हरिश वांगी, महांतेश ईश्वराप्पागोळ आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.