महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अवचारहट्टी-यरमाळ रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा

10:47 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनधारक-नागरिकांची मागणी  : उखडलेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय

Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

अवचारहट्टी-यरमाळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी म्हणून रस्ता गेल्या काही महिन्याभरापूर्वी उखडून ठेवण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या कामकाजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील वाहनधारक व नागरिकांतून होत आहेत. तेव्हा या रखडलेल्या रस्त्याचे कामकाज लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. वडगाव-यरमाळ रोड या भागातील नागरिकांना वडगाव व बेळगावला येण्यासाठी तसेच शेत शिवारामध्ये ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते.

उखडलेल्या रस्त्यावरुन वाहतूक करणे अवघड

शहापूर तळ ते अवचारहट्टीपर्यंतच्या बहुतांश रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र अवचारहट्टी जवळील अर्ध्या किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण अद्याप होणे शिल्लक आहे. रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनधारकांना अवघड बनले आहे. उखडलेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकी स्वार घसरुन पडत आहेत. यरमाळ-वडगाव रस्त्याच्या आजूबाजूला शिवार आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने शेतावर बळीराजाला जावे लागत आहे. मात्र अर्धा किलोमीटर रस्त्याचे कामकाज अर्धवट स्थितीत असल्याने इथल्या शेतकऱ्यांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण त्वरित पूर्ण करावे,अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article