For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढीव वीजबिलाच्या तक्रारी वाढल्या

11:38 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाढीव वीजबिलाच्या तक्रारी वाढल्या
Advertisement

तक्रारी तात्काळ दूर करण्याचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक शनिवारी सर्व उपकेंद्रांवर पार पडली. या बैठकींमध्ये वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी भूमीगत वीज वाहिनी निकामी झाल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. या तक्रारी तात्काळ दूर केल्या जातील, असे आश्वासन ग्राहकांना दिले. वाढीव वीजबिलांबरोबरच ट्रान्सफार्मर, विद्युत खांब या विषयीही तक्रारी मांडण्यात आल्या. काही तक्रारी तात्काळ सोडविल्या जाणार असून काही येत्या काही दिवसात सोडविल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.