महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी महिलेची कॅम्प पोलिसात तक्रार

11:46 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आपल्या ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट नफा देण्याचे सांगून शेट्टी गल्ली येथील एका महिलेला 5 लाखांना फसविण्यात आले आहे. यासंबंधी बुधवारी दोघा जणांविरुद्ध कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. शेट्टी गल्ली येथील उमा या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून काडय्या नागय्या हिरेमठ, रा. सदाशिवनगर, किरण सी. रा. कोरमंगल, बेंगळूर या दोघा जणांविरुद्ध भादंवि 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत. आपल्या एंजल वन ट्रेडिंग कंपनीत 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास आठवड्याला 8 हजार रुपयेप्रमाणे 30 आठवडे परतावा देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून उमा यांनी 29 एप्रिल 2023 रोजी 1 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. आठवडाभरात 8 हजार रुपये परतावा मिळाला. आठवडाभरात परतावा मिळाल्यामुळे विश्वास बसून त्यांनी आणखी 4 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर परतावा तर नाहीच गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article