For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुथरा बंधूंच्या ‘जीएस हॉस्पिटॅलिटी’ कंपनी विरोधात तक्रार नोंद

02:47 PM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुथरा बंधूंच्या ‘जीएस हॉस्पिटॅलिटी’ कंपनी विरोधात तक्रार नोंद
Advertisement

कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ‘ना हरकत दाखला’सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप

Advertisement

पणजी : हडफडे येथे 6 डिसेंबर रोजी आग लागून 25 जणांना मृत्यू आलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ हा क्लब सुऊ करण्यासाठी कोणतेच सोपस्कर पूर्ण केले नव्हते. यासाठी लागणारे परवानेही बनावट केल्याचे समोर आले आहे.क्लबसाठी अबकारी परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ‘ना हरकत दाखला’ वापरल्याचे आता उघड झाले आहे. आरोग्य केंद्राच्या प्रमुखांची बनावट सही आणि शिक्क्याचा गैरवापर करून प्रशासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी ‘जीएस हॉस्पिटॅलिटी’ या लुथरा बंधूंच्या कंपनीविऊद्ध गुन्हा नोंद केला आहे. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी यासंदर्भात म्हापसा पोलिसात तक्रार दिली आहे.

बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर हणजूण पोलिसांकडून सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान, संशयितांनी क्लबच्या अबकारी परवान्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राची एनओसी सादर केली होती. पोलिसांनी या दाखल्याची पडताळणी आरोग्य केंद्रामार्फत केली असता, असा कोणताही दाखला केंद्राने कधीच जारी केला नसल्याचे समोर आले. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. नाझारेथ यांचा जबाब नोंदवला. संबंधित ना हरकत दाखल्यावर डॉ. नाझारेथ यांची स्वाक्षरी आणि शिक्का होता. मात्र, आपण असा कोणताही दाखला दिलेला नाही आणि तो पूर्णत: बनावट असल्याचे डॉ. नाझारेथ यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.