For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओप्रकरणी तक्रार दाखल

दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओप्रकरणी तक्रार दाखल
Advertisement

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचे अनधिकृत चित्रीकरण करून त्याचे संपादित (एडिट) व दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

तसेच महिला अधिकाऱ्यांचा मानसिक छळ व प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडेही तक्रार सादर करण्यात आली असून, आडेली (ता. वेंगुर्ले) येथील जीवन कुडाळकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.