कुडचडेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बाचाबाची; आमदार फळदेसाईंच्या मुलाविरोधात तक्रार
कुडचडे : कुडचडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका महिला आणि तिच्या कुटुंबीयांशी बाचाबाची केल्याप्रकरणी आमदार राजेश फळदेसाई यांचा मुलगा राहुल याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुडचडे पोलीस करत आहेत.
शनिवारी रात्री या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये महिला आणि तिच्या कुटुंबीयांशी काही व्यक्तींची बाचाबाची होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीच्या आधारे कुडचडे पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, घटनेमागील नेमकी कारणे, सहभागी व्यक्ती आणि घटनेचा संपूर्ण क्रम तपासला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.