For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काशिनाथ शेट्यो यांच्याविरुद्ध मुरगाव पोलिसात तक्रार

07:55 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
काशिनाथ शेट्यो यांच्याविरुद्ध  मुरगाव पोलिसात तक्रार
Advertisement

आमदार आमोणकरसह मुरगावचे नागरिक एकवटले, केले विविध आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्यो यांच्या विरोधात शनिवारी संध्याकाळी आमदार संकल्प आमोणकर व नागरिकांनी एकत्र येऊन मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शेट्यो यांनी शुक्रवारी सकाळी बेकायदेशीररीत्या कारवाई करताना महिलांविरुद्ध अपशब्द वापरले, त्यांना ढकलले, धमक्या दिल्या, असे विविध आरोप आमदार आमोणकर व नागरिकांनी केले आहेत.

Advertisement

वीज अभियंते काशिनाथ शेट्यो यांनी शुक्रवारी सकाळी बोगदा-वास्को येथे वीज खात्याच्या जमिनीतून गेलेली पायवाट बंद करताना स्थानिक लोक व त्यांच्यामध्ये झालेल्या वादावादी प्रकरणी चौघांविरुद्ध पणजीत पोलीस तक्रार दाखल केली. सरकारी सेवा बजावताना अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने काशिनाथ शेट्यो यांच्याविरूद्धही मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली. शनिवारी संध्याकाळी बोगदा, सडा व जेटी भागातील नागरिक मोठ्या संख्येने मुरगाव पोलीस स्थानकाच्या आवारात एकत्र आले होते. आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, मुरगाव भाजपा मंडळ अध्यक्ष अविनाश नाईक या लोकांसमवेत होते. काशिनाथ शेट्यो यांची कृती बेकायदा होती. त्यांनी स्थानिक महिलांशी गैरवर्तन केले. महिलांविरुद्ध अपशब्द वापरले, त्यांना ढकलले, धमक्या दिल्या, असे आरोप करून नागरिकांनी शेट्यो विरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

काशिनाथ शेट्यो यांची कृती बेकायदा, अनधिकृत

आमदार संकल्प आमोणकर यांनी यावेळी माध्यमांकडे बोलताना सदर पायवाट ही नागरिकांची पारंपरिक पायवाट असून ती लोकांसाठी कायम उपलब्ध व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वीज खात्याला स्थानिक आमदारांसमवेत या जमिनीची पाहणी करण्याची सूचना केली होती. मात्र, वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सूचनेचे पालन केलेले नाही. त्या ऐवजी लोकांची पायवाट बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलली. मात्र, आपण तसे होऊ देणार नाही. अधिकारी काशिनाथ शेट्यो पुन्हा पुन्हा ‘बार’ चा उल्लेख करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. तेथे कोणतेही गैरप्रकार होत नाहीत. 1985 पासून बारला परवाना आहे. त्यावेळी तिथे कुंपण नव्हते. सदर अधिकारी आपण सरकारी सेवा बजावत आहे असे म्हणत असले तरी सकाळी सव्वा आठ वाजता सरकारी सेवा सुरू होत नाही. त्यांनी या सेवेसाठी रॅन्ट अ कार वापरलेली आहे, जे कायद्याने चुकीचे आहे. त्यांनी बजावलेली सेवा अनधिकृत आहे. महिलांशी त्यांनी गैरवर्तन केले, तेथील लोकांना आपल्या पारंपरिक पायवाटेचा वापर करण्यापासून रोखले. तसेच आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो असता आपले व्हिडियो चित्रण केले. त्यांची ही कृतीसुद्धा बेकायदा आणि अनैतिक आहे. एक सरकारी सेवक लोकप्रतिनिधीचे व्हिडियो चित्रण करतो, या प्रकारातून जनतेत चुकीचे संदेश पोहोचू शकतो, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.