For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरविरोधात तक्रार

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरविरोधात तक्रार
Advertisement

आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था /तिऊवनंतपुरम

केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी गुऊवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर सक्सेना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या बाजूने पक्ष फिरवण्यासाठी दक्षिणेकडील राज्यातील विविध चर्चच्या प्रमुखांना भेटत असल्याचा आरोप सतीसन यांनी केला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना हे दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांना कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी होण्यास मनाई आहे. सतीसन यांनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. यासंबंधी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सक्सेना यांनी सायरो मलबार चर्च, जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स चर्च, मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च आणि इतर प्रार्थनास्थळांना भेट देत तेथील प्रमुखांना निवडणूक प्रचारविषयक आवाहन केल्याचे म्हटले आहे. काही चर्चच्या प्रमुखांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांना भेटण्यास नकार दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.