For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल् फलाह विद्यापीठाविरोधात तक्रार

06:22 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अल् फलाह विद्यापीठाविरोधात तक्रार
Advertisement

दहशतवादाशी कनेक्शन, सखोल तपासणी होणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हरियाणातील फरीदाबाद येथील अल् फलाह विद्यापीठाविरोधात एफआयआर सादर करण्यात आला आहे. गेल्या मंगळवारी दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकानजीक झालेल्या भीषण दहशतवादी स्फोटामुळे हे विद्यापीठ प्रकाशात आले आहे. या स्फोटाचा सूत्रधार डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात काम करत होता. देशभरात अनेक स्फोट घडवून हाहाकार माजविण्याचे कारस्थान याच विद्यापीठाच्या एका इमारतीत रचण्यात आले आहे, असा आरोप असून या विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाची आणि व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती हरियाणा आणि दिल्ली पोलासांकडून देण्यात आली. प्रवर्तन निदेशालयानेही या विद्यापीठावर धाड घालून आर्थिक गैरव्यवहारासंबंधात चौकशी चालविलाr आहे.

Advertisement

या विद्यापीठात काम करणारा आणखी एक डॉक्टर मुझम्मील शकील याच्या भाडोत्री घरातून हरियाणा पोलिसांनी 2 हजार 900 किलो स्फोटके, 9 नोव्हेंबरला हस्तगत केली होती. त्या धाडीमुळे देशभरात दहशतवादी स्फोट मालिका घडवून आणण्याचे कारस्थान उघड झाले होते. या विद्यापीठात काम करणारे पाच डॉक्टर्स सध्या अटकेत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या विद्यापीठात काम करणारी आणखी एक डॉक्टर शाहीन शहीद हिलाही अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेमुळे दहशतवादाचा महिला चेहरा समोर आला आहे. तिच्यावर महिलांना दहशतवादी बनविण्याचे काम सोपविण्यात आले होते. हे रॅकेट देशभरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी सक्रीय होते. हे विद्यापीठ दहशतवाद्यांचा अ•ा बनले असून ते बंद केले जावे, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.