पर्यावरणपूरक आकाश कंदील स्पर्धेत वेंगुर्ला येथील प्रमोद गावडे प्रथम
रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
मयुर चराटकर
बांदा
रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रमोद गावडे,अणसुर वेंगुर्ला, द्वितीय क्रमांक देवानंद कलंगुटकर,बांदा, तृतीय क्रमांक विठ्ठल नार्वेकर, बांदा त्यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ क्रमांक अनिकेत अनिल तुळसकर, मोपा, गोवा याला मिळाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे,महादेव शांताराम पावसकर, श्री घाटवळ रोटरी क्लब वेंगुर्ला, रोटरी क्लब,बांदा अध्यक्ष श्री प्रमोद कामत, माजी अध्यक्ष श्री मंदार कल्याणकर, रोटरी क्लब बांदा सेक्रेटरी बाबा काणेकर, खजिनदार शिवानंद भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभागृहात बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक रोख रुपये 5000 चषक, प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक रोख रुपये 3000 चषक,प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रोख रुपये 2000 चषक, व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.विठ्ठल रुक्माई सभागृह बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक भव्य आकाश कंदील स्पर्धेत एकूण जवळपास 35 आकाश कंदील या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले होते. एका पेक्षा एक सरस असे आकाश कंदील पर्यावरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्य पासून आकाश कंदील बनवण्यात आले होते. एकंदरीत रोटरी क्लब बांदा त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. नेहमीच रोटरी क्लब बांदा नवनवीन उपक्रम घेऊन अशा प्रकारच्या स्पर्धा घेत असतात. स्पर्धेचे परीक्षण रणजित मराठे, सुनील नांदोसकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब बांदा चे सदस्य स्वप्निल धामापूरकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सुनील राऊळ, उत्तम सातार्डेकर, सचिन मुळीक, डॉ भालचंद्र कोकाटे, फिरोज खान, संजय शिरोडकर, संतोष सावंत, आबा धारगळकर, दिलीप घोगळे, दिगंबर गायतोंडे, सुधीर शिरसाट, विराज परब,आप्पा चिंदरकर यांनी परिश्रम घेतले.