महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पुरबाधित पिकांना हेक्टरी १ लाखाची नुकसान भरपाई द्या! चेतन नरके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : कृषी मंत्र्यांशी साधला संपर्क

07:45 PM Aug 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
Dr. Chetan Narake
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवस पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला असून खरीप हंगामातील भात, सोयाबीन व ऊस पिके पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्यात बुडालेली पिके शंभर टक्के खराब झाली असून त्यांचे पंचनामे करुन त्यांना ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’चे निकष बाजूला ठेवून हेक्टरी १ लाखांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी शनिवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. याबाबत, त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्यातील वस्तूस्थिती सांगितली आहे.

Advertisement

गेली दहा दिवस भात, सोयाबीन व ऊस असे ६० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. भात व सोयाबीन पिके कुजली असून ऊस पाण्याखाली गेल्याने त्याच्या शेंड्यात माती गेल्याने तो झपाट्याने खराब होऊ लागला आहे. शिरोळ व करवीर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. करवीरमधील शिये, भुये, वडणगे, वरणगे, प्रयाग चिखली, आंबेवाडीसह पन्हाळ्यातील बाजारभोगाव, यवलूज, कळे, धामणी खोऱ्यात पुराच्या पाण्याने उभी पिके उध्दवस्त झाली आहेत.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्याचे पंचनामे सुरु होतील, पण मागील २०१९ व २०२१ च्या महापूरानंतरची शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई फारच तोकडी होती.

‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ च्या निकषानुसार बागायत पिकांना हेक्टर १७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. सलग आठ दिवस ऊस पाण्याखाली राहिला तर त्याचे १०० टक्के नुकसान होते. पाणी ओसरल्यानंतर जरी ऊस पिक व्यवस्थीत दिसत असले तरी महिन्याभरात त्याला प्रत्येक डोळ्यातून फुटवा फुटण्यास सुरुवात होते व ऊस पोकळ होतो. पंचनामा करताना त्याचे नुकसान ३३ टक्यापेक्षा अधिक दिसत नसले तरी वजन पुर्णपणे कमी होऊन अक्षरशा खोडवे तयार होते. खराब झालेला ऊस शिवारातून बाहेर काढायचा म्हटले तरी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येतो. पण, शासन त्याला १७ हजार रुपये भरपाई देते. हे शेतकऱ्यांची चेष्टा असून ऊस उत्पादकांचे होणारे नुकसान पाहता गुंठ्याला किमान १ हजार म्हणजेच हेक्टर १ लाख रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. चेतन नरके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

Advertisement
Tags :
#chetan narkecompensationthe District Collector
Next Article