For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागील वर्षापेक्षा 84 मि.मी. पावसाची अधिक नोंद

11:18 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मागील वर्षापेक्षा 84 मि मी  पावसाची अधिक नोंद
Advertisement

मात्र दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम : मान्सूनची आतापर्यंत साथ 

Advertisement

बेळगाव : हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. 1 जूनपासून 5 जुलैपर्यंत जिल्ह्यात 232 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी 84 मि.मी. पावसाची अधिक नोंद झाली आहे. यावर्षी वळिवाबरोबरच मान्सूनने आतापर्यंत साथ दिली आहे. मात्र, अजूनही जुलै तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. 1 जूनपासून 5 जुलैपर्यंत सर्वात जास्त खानापूर तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. एकूण 622.2 मि.मी. पावसाची नोंद तेथे झाली आहे. त्या खालोखाल बेळगाव तालुक्यात पावसाची नोंद झाली असून 280.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक पावसाची नोंद या दोन्ही तालुक्यांमध्ये झाली आहे. सर्वात कमी रामदुर्ग तालुक्यात नोंद झाली आहे. केवळ 80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जूनमध्ये 188 मि.मी. पावसाची नोंद

Advertisement

जून महिन्यामध्ये मागील वर्षी 116 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जून महिन्यात 188 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी 72 मि.मी. पावसाची अधिक नोंद झाली आहे. असे असले तरी अजूनही दमदार पाऊस पडण्याची गरज आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अजून तरी पावसाची नोंद झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वळीव पाऊसही दमदार कोसळला होता. हुक्केरी तालुक्यात सर्वात जास्त वळीव पावसाची नेंद झाली आहे. 174.1 मि.मी. वळीव पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल कित्तूर तालुक्यात 169.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र याठिकाणी मान्सून पाऊस कमी झाला आहे. हुक्केरी तालुक्यात आतापर्यंत 137.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर कित्तूर तालुक्यात 170.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी वळिवाने चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये वळीव पावसाची नोंद बऱ्यापैकी झाली आहे. त्या तुलनेत मान्सून पावसाचे प्रमाण आतापर्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत मान्सूनची अधिक नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.