स्वस्त इंधन पर्यायांवर कंपन्यांचे लक्ष
डिझेल-पेट्रोलऐवजी, सीएनजी आणि हायड्रोजनवरही वाहने धावणार ः ऑटो एक्स्पोमधून कंपन्यांचा सूर
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योग वेगाने बदलाच्या काळातून जात आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये, बहुतांश कंपन्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) व्यतिरिक्त स्वस्त आणि प्रगत इंधन पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत. त्याचबरोबर ग्राहकही अधिक खर्च करण्यास तयार असल्याचे दिसून आले आहे.
काही कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल वाहनात बसवता येणारी आणि हायड्रोजन, बायो-डिझेल, इथेनॉल, सीएनजी आणि एलएनजीवर चालणारी अशी इंजिन सिस्टिम विकसित केली आहे.
ईव्ही व प्रगत हायब्रिड तंत्रज्ञानाच्या कार दिसू लागल्या
इंजिनशी संबंधित अनेक पर्यायी तंत्रज्ञान एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आले. अशी डझनभर बॅटरी इलेक्ट्रिक वाहने दाखवण्यात आली, जी संकल्पना किंवा प्रोटोटाइप नसून उत्पादन मॉडेल आहेत. म्हणजे या वर्षी ती रस्त्यावर आणता येईल. पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त, प्रगत हायब्रीड तंत्रज्ञान असलेल्या काही कार देखील दर्शविल्या गेल्या. यामध्ये स्व-चार्जिंग तंत्रज्ञान आणि प्लग-इन हायब्रीडचा समावेश आहे.
पेट्रोल-डिझेल वाहनांचे मर्यादीत लाँचिंग
याशिवाय, काही कंपन्यांनी हायड्रोजन ज्वलन इंजिन मॉडेल, हायड्रोजन इंधन सेल वाहने आणि फ्लेक्स-इंधन मॉडेल्स देखील प्रदर्शित केले. मात्र, केवळ पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱया वाहनांचे लाँचिंग मर्यादित राहिले. या शोमध्ये 114 हून अधिक वाहन उत्पादक कंपन्या, सुमारे 800 भाग बनवणाऱया कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
इथेनॉलचा वापर वाढल्यास होणार फायदा
सर्वसामान्यांना काय फायदा
इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणारी कार पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी गरम चालते. इथेनॉलमध्ये अल्कोहोल लवकर बाष्पीभवन होते, त्यामुळे इंजिन लवकर गरम होत नाही. याशिवाय ते कच्च्या तेलापेक्षा खूपच स्वस्त असेल. त्यामुळे महागाईतूनही दिलासा मिळणे अपेक्षित आहे.
शेतकऱयांना फायदा
इथेनॉलचा वापर वाढल्याने शेतकऱयांचे उत्पन्नही वाढेल. कारण इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनवले जाते. साखर कारखानदारांना उत्पन्नाचे नवे स्त्राsत मिळणार असून भविष्यात त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. इथेनॉलमुळे शेतकऱयांना 21 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.