For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणांशी संवाद भावतो : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

06:44 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणांशी संवाद भावतो   मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत
Advertisement

वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

देशाचे भविष्य असलेल्या तरुणांशी संवाद साधणे आपणाला नेहमीच आवडते. त्यांच्याशी संवाद साधताना आनंददायी वाटते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

Advertisement

शनिवारी सकाळी राज्यातील दहावी, बारावी आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुढे बोलताना त्यांनी तऊणांना उज्ज्वल आणि यशस्वी भविष्य घडवण्यासाठी विविध करिअर पर्याय शोधण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, संस्था आणि उद्योग यांच्यातील विविध सहयोगी उपक्रम राबवून गोवा सरकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी  नमूद केले. गोव्यात शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून प्रत्येकाने अशा संधींचा शोध घेत राहावे, असेही ते म्हणाले.

प्रत्येक विद्यार्थ्याचे करिअर चांगले घडावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ही जबाबदारी प्रत्येक शिक्षकाने घेऊन वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या वेबिनारमध्ये उच्च शिक्षण संचालनालयाचे महादेव गावस, अनुसूचित कल्याण संचालनालयाचे अधिकारी अभिजित जांभळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement
Tags :

.