महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विकास कामांबरोबरच जनतेशी संवाद साधा

01:04 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना : आठवड्यातून एकदा तरी जनतेच्या संपर्कात राहा

Advertisement

पणजी : राज्यातील जनता हीच सरकारसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे, अडचणीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण राज्याचा विकास करताना जनतेशीही ‘कनेक्ट’ राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. जनतेशी संपर्कात राहिलो तरच आपल्याला त्यांच्या समस्या सोडविता येणे शक्य आहे. म्हणून खात्याच्या प्रत्येक मंत्री व आमदारांनी जनतेशी वारंवार संपर्क करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे बंधनकारक राहील, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांना दिली आहे. पणजीतील घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांना जनतेशी नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. या कार्यकारिणीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतर सदस्य उपस्थित होते.

Advertisement

मंत्र्यांनी बुधवारी जनसंपर्क साधावा 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सरकारच्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी बुधवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत जनतेशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस एका मंत्र्याने पणजीतील भाजप कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणेही बंधनकारक असणार आहे. सरकारच्या विविध योजना व विकासकामांची माहिती आपण जनतेला वारंवार सांगितली आणि त्यातील त्रुटीबाबत चर्चा केली तरच सरकार म्हणून आपण नवीन काही करू शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करता कामा नये.

राज्यसभा खासदार तानावडे यांनी मंत्र्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगितले. देशात डबल इंजिन सरकार असल्यामुळे जनतेची कामे करण्यात कोणतीच अडचणी नाहीत, याकडे मंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील विकासकामांसाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी असल्यामुळे कामे पारदर्शी होण्यासाठी मंत्र्यांनी स्वत: लक्ष घालण्याची गरज आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने कार्यकर्ते यांच्याशी मंत्र्यांनी व आमदारांनी नियमित चर्चा करून संपर्कात राहणे गरजेचे आहे. आठवड्यातून किमान एकदातरी जनतेशी व कार्यकर्त्यांशी मंत्र्यांनी, आमदारांनी चर्चा करून प्रश्न सोडवायला हवेत, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले. या बैठकीत दिगंबर कामत, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स सिक्वेरा, गोविंद गावडे, आमदार केदार नाईक, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, प्रवीण आर्लेकर, उल्हास नाईक, दाजी साळकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्यातही तिसऱ्यांदा भाजपच सत्तेत आणूया

भाजपने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा विक्रम केला आहे. केंद्र सरकारने हल्लीच तिसऱ्या टर्ममधील 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेऊन देशातील जनतेच्या विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. त्याचपद्धतीने राज्यातीलही सरकारच्या कामाचा आढावा आणि जनतेच्या विकासकामांबाबत प्रत्येकाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. राज्यातील विकासकामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येण्यासाठी प्रत्येकाने झोकून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article