For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये जातीय हिंसाचाराचा आगडोंब

07:00 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये जातीय हिंसाचाराचा आगडोंब
Advertisement

तिघांचा मृत्यू : सहाहून अधिक शहरांमध्ये संचारबंदी लागू : परिस्थिती नियंत्रणासाठी लष्करही सतर्क

Advertisement

वृत्तसंस्था/काठमांडू

नेपाळमधील सुनसरी येथे उफाळलेला जातीय हिंसाचार आता अन्य अनेक शहरांमध्ये पसरला आहे. गेल्या चार दिवसांपासून देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांशी झालेल्या संघर्षाच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की स्थानिक प्रशासनाला अनेक जिह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यास भाग पडले, तर लष्कराने रस्ते आणि संवेदनशील भागांवर देखरेख ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. वेगवेगळ्या भागात भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर गोळीबारासह विविध घटनांमध्ये डझनभर लोक जखमी झाले आहेत.

Advertisement

जखमींमध्ये आंदोलक, स्थानिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असून अनेक वाहने आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. नेपाळच्या सुनसरी जिह्यात कावड यात्रेदरम्यान मोठ्या आवाजातील डीजे संगीतावरून झालेल्या एका किरकोळ वादाचे मोठ्या जातीय तणावात रुपांतर झाले आहे. सुरुवातीला दोन समुदायांमधील शाब्दिक बाचाबाचीपुरते मर्यादित असलेले हे प्रकरण मोठ्या हिंसाचारात बदलल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. हिंसाचार घटनेनंतर संपूर्ण तराई-मधेश प्रदेशात आंदोलने सुरू झाली. आंदोलनादरम्यान सिराहा येथे आणखी एका तरुणाच्या मृत्यूमुळे तणाव आणखी वाढला.

राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांचे आवाहन

दरम्यान, नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी सुनसरी जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील अलीकडील प्रतिकूल परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शतकानुशतके चालत आलेली सामाजिक, धार्मिक आणि वांशिक सलोखा, सहिष्णुता, परस्पर सामंजस्य, बंधुत्व आणि राष्ट्रीय ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत

भक्तगण डीजे आणि लाऊडस्पीकरच्या साथीने कोसी बॅरेजमधून पाणी घेऊन परत येत होते. दरम्यान, दुसऱ्या समाजातील काही सदस्यांनी मोठ्या आवाजातील संगीतावर आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती झपाट्याने हिंसक संघर्षात बदलली. सुरुवातीला, स्थानिक पोलीस आले आणि त्यांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, दोन्ही समाजांतील लोक काठ्या, बांबू, दगड आणि भाले यांसारखी शस्त्रे घेऊन रस्त्यावर एकमेकांसमोर ठाकल्याने संघर्ष तीव्र झाला.

पोलिसांकडून हवेत गोळीबार

जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. याचदरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत एका इन्स्पेक्टरसह आठ पोलीस जखमी झाले. परिस्थिती चिघळल्याने, जवळच्या पोलीस ठाण्यांमधून आणि सशस्त्र पोलीस दलातून अतिरिक्त पथके बोलावण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जमावाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण हिंसाचार थांबला नाही.

Advertisement
Tags :

.