महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांप्रदायिक शक्तींचे राहुल, प्रियांका वड्रांना समर्थन

06:49 AM Dec 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माकप नेत्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

माकप पॉलिट ब्युरोचे सदस्य ए. विजयराघवन यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा या अल्पसंख्याक सांप्रदायिक शक्तींच्या समर्थनाद्वारे वायनाड येथे विजय मिळविला होता. मुस्लीम सांप्रदायिक आघाडीच्या मजबूत समर्थनाशिवाय राहुल गांधी हे विजयी होऊ शकले असते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

विजयराघवन यांनी वायनाडच्या बाथरी येथे माकपच्या संमेलनाला संबोधित करताना हा दावा केला आहे. आता वायनाड येथून दोन जण विजयी झाले आहेत, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा. राहुल गांधी हे कुणाच्या समर्थनाने लोकसभेत पोहोचले? मुस्लीम सांप्रदायिक आघाडीच्या मजबूत समर्थनाशिवाय ते जिंकू शकले असते का?  त्यांच्या सभांदरम्यान कोणते लोक उपस्थित होते? अल्पसंख्याक सांप्रदायिक शक्तींमधील सर्वात कट्टरपंथी घटक हेते का असा सवाल माकप नेत्याने उपस्थित केला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी प्रियांका वड्रा या जमात-ए-इस्लामीच्या समर्थनाने निवडणूक लढवत असल्याचा आरोप केला होता. तर विजयराघवन यांच्या टिप्पणीवर काँग्रेस नेते पे.सी. वेणुगोपाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी जेव्हा डॉ. आंबेडकर यांचा अपमान केला तेव्हा सर्वप्रथम विजयन यांनी यावर प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, परंतु त्यांचा पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article