राष्ट्रकुल कबड्डी : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
वृत्तसंस्था, अहमदाबाद : भारताने येथे श्रीलंकेवर 45-24 असा दणदणीत विजय मिळवत राष्ट्रकुल कब•ाr स्पर्धा, 2026 मधील गट फेरीतील आपला अपराजित प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
भारताने गट फेरीतील आपले सर्व सहा सामने जिंकून वर्चस्वपूर्ण कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये पंकज मोहितेने 15 गुणांसह चढाई विभागात आघाडी घेतली, तर आदित्य शिंदेने 10 गुणांचे योगदान दिले. नितेशने पाच गुण मिळवले, तर योगेश दहियाने चार गुणांची भर घातली. भारताने प्रभावी चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर 21 गुणांनी विजय नोंदवला.
इतर सामन्यांमध्ये बांगलादेशने स्कॉटलंडला 70-20 ने पराभूत करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यामध्ये मोहम्मद अल-अमीनने 24 गुण आणि मोहम्मद हसिबुल होसेनने 12 गुणांची भर घातली. टांझानियाने इंग्लंडला 36-27 ने हरवले, तर युगांडाने नायजेरियावर 48-23 ने विजय नोंदवला. अटीतटीच्या लढतीत कॅनडाने सिंगापूरवर 45-38 ने मात केली आणि केनियाने ऑस्ट्रेलियावर 76-27 असा एकतर्फी विजय मिळवून दिवसाच्या खेळांची सांगता केली.