For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जप्त रोख रक्कम सोडविण्यास समिती स्थापन

10:50 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जप्त रोख रक्कम सोडविण्यास समिती स्थापन
Advertisement

लोकसभा निवडणूक आचारसंहिता पालन : आवश्यक कागदपत्रे दाखवून मिळविता येते रक्कम

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50 हजारपेक्षा अधिक रोख रक्कम घेऊन जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ही जादाची रक्कम निवडणूक विभागाच्या एफएसटी एसएसटी पथकाने जप्त केल्यास ती त्वरित परत करण्यासाठी कॅश रिलिज कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक विभागाकडून जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे सक्तीचे केले आहे. 50 हजारपेक्षा अधिक रोख रक्कम कागदपत्रे नसताना घेऊन जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कॅश रिलिज कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य गौरीशंकर कडचूर असून यांच्याकडे रोख रकमेसंदर्भातील कागदपत्रे हजर करून रक्कम घेऊन जाता येते. त्यांना 9560273950 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे हजर करून जप्त रक्कम घेऊन जाता येते, असे जिल्हा नोडल अधिकारी, निवडणूक खर्च पर्यवेक्षक आणि सदस्य जिल्हा कॅश रिलिज कमिटी, काडाचे मुख्य अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.