महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या अभ्यासासाठी समिती स्थापन

02:45 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित कळसा-भांडुरा व इतर प्रकल्पांचा म्हादई अभयारण्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तज्ञांची समिती नेमली असून एका महिन्यात अहवाल देण्यास बजावले आहे.  कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या म्हादई नदीवर कळसा-भांडुरा, हलतरा व सुर्ला ठिकाणी प्रकल्प बांधण्याची कर्नाटक सरकारची योजना असून पाणी वळवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी अद्याप कर्नाटकला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे कळसा-भांडुरा या प्रकल्पाचे काम पुढे नेणे अशक्य झाले असून ते प्रलंबित ठेवण्याची पाळी कर्नाटक सरकारवर आली आहे. म्हादई नदीवरील या नियोजित प्रकल्पाची दखल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने घेतली असून त्याचा पर्यावरण व इतर वन्यजीवनावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन केली आहे. ती समिती सदर प्रकल्पाबाबत कोणता अहवाल देते त्यावरच कर्नाटकच्या प्रकल्पांचे तसेच म्हादईचे भवितवय अवलंबून आहे. प्राधिकरणाचा अहवाल देखील सर्वोच्य न्यायालयात सुनावणीच्या वेळी महत्त्वाचा ठरू शकतो असेही सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article